पोस्ट्स

ऑगस्ट, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रिय मित्रांनो....

प्रिय मित्रांनो, तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आहे की,यापुढे या ब्लोगवर आपल्यासाठी खास मंत्र मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे..फ़क्त तुम्ही भेट देत रहा. तरुणांसाठी करीयर, शिक्षकांसाठी दररोजच्या घडामोडी, विद्यार्थ्यासाठी अभ्यास टीप्स, महिलांसाठी महत्वाच्या टीप्स, संगणक प्रेमी साठी सोफ़्ट्वेअर, बेरोजगारासाठी संधी, साहित्यिकांसाठी माहिती,आणि व्यासपीठ. या सर्व बाबी या ब्लोगवर भेट्तील..जग आज एवढे गतीमान झाले आहे..मग आपला महाराष्ट याला अपवाद कसा राहील..या सर्व संधीचा फ़ायदा घेउन आपण माहितीची शिखरे पादांक्रांत करु या..

शिक्षक पात्रता चाचणी, ओक्टोबर किंवा नोव्हेंबर मधे.

शिक्षक पात्रता चाचणी, ओक्टोबर किंवा नोव्हेंबर मधे.   प्रिय शिक्षक मित्रांनो शिक्षक पात्रता चाचणी शासनाने शासन निर्णय काढुन निश्चित केली आहे..५ प्रुश्ठाचा हा निर्णय आता आपली परिक्षा घेणार आहे..त्याबाबतची सविस्तर माहिती हवी अस्ल्यास तुम्ही येथे क्लिक करा.

आता सिद्ध करावी लागेल पात्रता

आता सिद्ध करावी लागेल पात्रता. १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना आता अध्यापन पात्रता सिद्ध करावी लागणार आहे,गंमत अशी आहे की, आपण बदलाला पटकन सामोरे जात नाही,, घाबरु नका ही परिक्षा अगदी सोपी आहे..या क्षेत्रात आता नवनवीन बदल होत आहेत.तेंव्हा आपल्याला बदलावे लागेल.तुम्ही म्हणाल आम्ही व्यावसायीक पात्रता संपादन केली आता ही कसली पात्रता...दररोज होत असलेला माहितीचा स्फ़ोट य़ात आपण कोठे आहोत हे आता तपासले जाणार आहे..प्रत्येक ७ वष्राला आपली नवीन पात्रता सिद्ध करावी लागेल.... आपण जे दररोज शिकवतो तेच या पेपरमधे असणार आहे.ते आपण किती समजुन शिकवतो.ते आता कळणार आहे..मग आता लागा कामाला..थोडेसे अधिक चिंतन ,मनन,वाचन करा. एकूण पेपर २ एकूण गुण ३०० वेळ प्रत्येकी दीड तास. विषय.... बालविकास व अध्यापन शास्त्र.३० गुण. मराठी ....................३० गुण हिंदी...................................३० गुण गणित .................................३० गुण. पर्यावरण अभ्यास...................३० गुण अ़शी रचना या परिक्षेची असणार आहे..या परिक्षेत आपल्याला ६० % गुण घ्यावे लागतील.... या संदर्भात काही बदल झाले...

समाजाची आजची अवस्था......

समाजाची आजची अवस्था फार वाईट झाली आहे..खून आणि बलात्कार या बाबी आता जगमान्य झाल्या आहेत की काय ? असे वाट्ते. माणूस खालच्या पातळीवर जाउन विचार करेल असे आजची शैक्षणिक प्रगती पाहता. वाट्त नाही पण शिक्षण साफ अपयशी ठरले आहे..माणसाला माणसाची भीती वाटावी ही फ़ार मोठी शोकांतिका आहे.. भारताने या बाबी कधीच गांभिर्याने घेतल्या नाहीत..इथल्या राजकारण्यांना लोकांना जात.धर्म यात गुंतवुन ठेवावे वाट्ते ,,आणि समाज याला बळी पडतो.हा आजपर्यंतचा इतिहास आहे. एखाद्याचा खुन होतो..समाज दोन दिवस दुखवटा व्यक्त करते.पुन्हा काही दिवसांनी तेच, विचित्र अवस्था समाजाची झाली आहे.इथला कायदा ,.राजकारण .शिक्षण,या गोश्टी भ्रष्ट झाल्याने ..समाज रसातळाला गेला आहे..आणि हे आता वाढत जाणार..हे थांबणारे नाही..थांबेल पण वरील तीन बाबी सुधारल्या पाहिजेत..त्या सुधारणे आता ..शक्य नाही..का नाही वगैरे या गप्पा आहेत. आणि गप्पांना भारतात काही कमी नाही. ज्यादिवशी समाज आत्मचिंतन करायला प्रारंभ करेल..तेव्हाच क्रांती होइल ..तोपर्यत नाही.  

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली.सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात आला.हे असं किती दिवस चालणार.एकीकडे महाराष्ट पुरोगामी वगैरे म्हणायचे आणि आपल्याला वाटॆल तसे वर्तन करायचे.. समाजाला आत्मचिंतन करावे लागेल .की अशा व्रुती का निर्माण होत आहेत..समाजाच्या हितासाठी झगड्णा-यांना जर अशी शिक्षा मिळत असेल तर....समाज किती रानटी अवस्थेत आहे..हे आपल्याला जाणवेल..दहशतवाद .ऩक्षलवाद या बाबी ..... पूर्वसुचना देउन केल्या जातात..पण हा प्रकार मात्र ..नवीन जन्माला आला आहे.याचा गांभिर्याने विचार करा...प्रगती वगैरे गप्पा बाजुला ठेवा...या व्रुत्ती का निर्माण झाल्या याचा विचार प्रथम करा. २].. एका सज्जन ,मानवतावादी ,समाजवादी माणसाचा खुन होत असेल तर,,,ही समाजाची शेवट्ची घटका आहे..हे नक्की समजा.. नरेंद्र दाभोळ्कर नावाच्या माणसाची आणि माझी भेट १९९९ मधे पत्र रुपाने झाली...मी चिंतनाच्या बाबतीत नवखा असुन सुद्धा या महान व्यक्तीने मला..समंजसपुर्वक उत्तर दिले.मी आंतरभारती ओराद शहाजानी जि.लातुर या उपक्रमशिल संस्थेत कार्यरत होतो...प्राचार्य सदाविजय आर्य सरांनी माझे पत्र वाचले....नरेंद्र दाभोळकर...

विनाअनुदानित शाळांचे भिजत घोंगडॆ.......

विनाअनुदानित शाळा आणि त्यांचे अनुदान हा चर्चेचा विषय सद्या शिक्षण क्षेत्रात जोरात चालू आहे..वास्तविक पाहता शासनाने शिक्षण सम्रुध्दीसाठी शिक्षकांना अधिक भिकेला न लावता.सहानुभूतीपुर्वक विचार करावा..शाळांचे जे निकष आहेत त्यात थोडी लवचिकता ठेवणे समाजाच्या हिताचे आहे...एकीकडॆ शिक्षणाला मोठे महत्व द्यायचे आणि शिक्षकांच्या पदवीला शून्य किंमत द्यायची...हा विरोधाभास समाज जवळुन अनुभवतो आहे... १] शाळांचे अनुदान निकष बदलावे. २]१००% पटनोंदणी त या शाळांचाही सहभाग आहे.याचे स्मरण ठेवावे. ३]ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षणाचा आस्वाद घेता यावा. ४]या सर्व बाबींचे भान न ठेवल्यास समाजात ,शिक्षणात एक प्रकारची दरी निर्माण होइल. 

पहिली ते आठवी नो नापास..

                                            पहिली ते आठवी नो नापास.                         शिक्षण परिवर्तनशिल असले पाहिजे  परिवर्तन हा त्याचा पाया आहे प्राण आहे-  शिक्षण गतिमान असले पाहिजे.शिक्षण प्रवाही असले पाहिजे . या चिरंतन विचाराला आपण केव्हाच मुठमाती दिली आहे. परिवर्तन म्हणूण परिक्षा बदलणे,अभ्यासक्रम बदलणे,उपक्रमांचा भडीमार करणे, इत्यादी, आता तर कहरच झाला……. "पहिली ते आठवी नापास".   याचा परिणाम झाला.   १-विद्यार्थी निश्क्रीय झाले.   २-संबंधित वर्गाची जबाबदारी राहीली नाही.   ३-हजेरीपटाचे गांभिर्य राहीले नाही, ४-मुल्यमापनात शुध्दता राहीली नाही, ५-पालक आणि विद्यार्थ्यात विनोदी चर्चा.      

शाळा की कोंडवाडॆ

                                                             शाळा की कोंडवाडॆ   सकाळी उठ्ल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत बालमनावर जे शाळेविषय़ी आघात होतात ते न  थांबण्यासाठी दिवसभर तीच शाळा,तेच शिक्षक ,तोच परिसर,तीच पुस्तके् य़ांमुळे बालपन पुरते दबुन जाते ,वास्तविक पाहता "आनंददायी शिक्षण" त्यांच्या गावी अद्याप नाही , मानसशास्त्रातील दमन प्रक्रिया विपरीत कार्य करतांना दिसते,याचा विचार अद्याप शिक्षक ,पालक,हितचिंतक यांना करावयाचा आहे, एक बाब गंभीर पणे चालु आहे,ती ही की ,मुले दररोज शाळेत येतात,विद्या ग्रहन करतात,,,दिवसभर जे डोक्यात भरले जाते ते घेउन शाळेच्या बाहेर असे पडतात जसे की जेलमधील कैदी सुट्ले आहेत आजच्या शाळा विद्यार्थ्यांना विद्यामंदीर न वाट्ता कोंड्वाडॆ वाट्तात,,,,,याचाही विचार व्हायला