पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चला TET बाबत सांगा.SSA म्हणजे काय ? MDMS म्हणजे काय ? .

इमेज
शैक्षणिक बाबीशी संबधित काही य़ॊजना.काही शब्द आणि काही उपक्रम यांच्याशी संबधित संक्षिप्त रुपे आपल्या परिक्षेसाठी हमखास विचारले जातात.ती आपल्याला माहित असने महत्वाचे आहे.खुप वेळा असे होते एखाद्या योजनेचे short form आपल्याला माहित नसते मग तो प्रश्न आपला चुकतो.सद्या कोणत्या शैक्षणिक योजना चालू आहेत.त्या कशा प्रकारे राबवल्या जातात.आणि त्याचा फ़ायदा काय आहे. या योजनेचे एक संक्षिप्त रुप असते.जसे...SSA-- SARVA SHIKSHA ABHIYAAN OR MDMS----MID-DAY MEALS SCHEME अशी काही रुपे आपल्याला माहित असने महत्वाचे आहे.एखादा तरी प्रश्न यावर असतोच.मग सहज एक प्रश्न आपला आपण तयार ठेवायला काय हरकत आहे.मी काही short form देत आहे.सहज त्यावर नजर टाका.नंतरच्या पोस्ट मधे मी शिक्षणाशी संबधित सर्व योजना कोणत्या त्या कशा राबविल्या जातात ते सांगतो.धन्यवाद TET..Teacher Eligibility Test. SEN: Special Educational Needs ESW: Educational Social Worker TENet: Texas Educational Network EBT: Educational Benefit Trust EDU: Educational Organizations EDUCOM: Educational Communication EFI: Educational Futures, Inc. EPA...

चला गणित अधिक सोप्या पद्धतीने शिकण्याचा आणि शिकविण्याचा सराव करु या.

इमेज
बाजारात गणित शिकविण्याच्या अनेक सीडी बाजारात उपलब्ध आहेत.पण त्यात असलेली माहिती कमी आणि त्याची जाहिरात,किंमत मात्र अपेक्षेपेक्षा अधिक असते.मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही सीडी विकत घेतल्या पण भ्रमनिरास झाला.मला जे हवे होते ते त्यात नव्हते.कोणताही विषय अधिक सोप्या पद्धतीने शिकला आणि शिकवला की त्या विषयाचा लळा विद्यार्थ्यांना लागतो.हे अध्यापनाचे महत्वाचे सुत्र आहे.एक दिवस ईंटरनेटच्या जगात प्रवास करताना एक गणित शिकविणारे मजेशीर सोफ़्टवेअर मला भेटले. ते मी तुमच्यासाठी घेउन आलो आहे. हे छोटेसे सोफ़्टवेअर डाउनलोड करुन घ्या.आणि गणित शिका सोप्या पद्धतीने .सदरील सोफ़्टवेअर हे माइक्रोसॉफ्ट या कंपनीने बनविले असून ते खास गणित शिकण्यासाठी व शिकविण्यासाठीच आहे.तुम्हाला हे अगोदरच माहित असेल तर याला विसरा.नसेल तर तुम्ही अनुभव घ्या आणि इतरांना सांगा.ते महत्वाचे सोफ़्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणताही प्रश्न विचारा आणि समाधानकारक उत्तर मिळवा...

इमेज
आता प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संदर्भ ग्रंथ शोधण्याचे दिवस संपत चालले आहेत.कारण जगात कोण कोणासाठी सुविधा निर्माण करत आहेत हे कल्पनेच्या पलीकडे आहे.एक जण लाखो लोकांच्या हितासाठी कार्य करतो आणि आपल्या माहिती संकलनात सुलभता येते.प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत नसते असा एक विचार आपल्याकडॆ होता.तो आज विचार निकाली निघाला असे खुशाल समजा.एक अशी वेबसाईट आहे ती आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते.एवढेच नाही,भले मोठे गणित जरी विचारले तर ती तुम्हाला तात्काळ उत्तर देते.उत्तर एवढे सविस्तर असते की.आपण आवाक होतो.हा खजिना आपल्याला ओनलाईन उपलब्ध आहे. या वेबवर जा आणि सर्च बोक्स मधे टाका तुमचा प्रश्न ..काही सेकंदात उत्तर तुमच्या समोर.त्या अजब वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

चला आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम समजून घेऊ य़ा..

इमेज
१] बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र.. या विषयाच्या संदर्भात विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील.अध्ययन प्रक्रिया बाबतीत अधिक जोर प्रश्नावर दिला जाईल.अभ्यास करताना एक विचारात घ्या की.तुमची भूमिका काय असणार आहे.एक शिक्षक म्हणून तुम्ही काय करु शकता हे महत्वाचे आहे.सद्याचा अभ्यासक्रम हा शिक्षककेंद्रित नसून तो विद्यार्थी केंद्रित आहे.मग विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार सद्याच्या अभ्यासक्रमात कसा प्रतिबिंबीत झाला आहे.याचा विचार करा. अध्ययन प्रक्रिया.शिक्षणात मानसशास्त्राची भूमिका काय आहे,प्रयोग आणि त्याचे महत्व,वयाचा अध्ययन प्रक्रियेवर होणारा परिणाम कोणता.अशा मुलभूत बाबीवर प्रकाश टाकला जाईल. २] भाषा..मराठी ,इंग्रजी व उर्दु . भाषा हा विषय आपल्याला...

चला TET चा ओनलाईन अर्ज भरु या...

इमेज
मित्रांनो आपण सर्वजन या तयारीत आहात की.आता अर्ज भरावयाचा आहे.अर्ज ओनलाईन असल्याने तो आता काळजीपूर्वक भरला पाहिजे.जे टप्पे आहेत त्यानुसार तो अर्ज भरा.त्याची प्रिंट सांभाळून ठेवा.त्यासाठी द्यावी लागणारी फ़ी तेवढीच द्या.अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जातो.सद्या अर्ज भरण्याची धडपड अधिक विद्यार्थ्यांची असणार आहे.मग ब-याच वेळा वेबसाईट ऒपन होत नाही.कार्यालयीन वेळेच्या व्यतिरीक्त अर्ज भरा.अर्ज भरताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या पोर्टलवर फ़ीडबेक आहे का ते पहा.आणि अभ्यासाला लागा.तुम्हाला शुभेच्छा आहेतच.त्या परत देण्याचा ओपचारिक पणा कशाला. ओनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

चला एका महिण्यात इंग्रजी बोलण्यास शिकू य़ा.....

इमेज
आज इंग्रजीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असून तिचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.आजुबाजूस जर कोणी इंग्रजीत संभाषण करत असेल आणि आपल्याला जर जमत नसेल तर मात्र आपल्याला आपलेच हसू य़ॆते.इंग्रजी बोलण्यास शिकण्यासाठी असा काही अधिक वेळ द्यावा लागत नाही पण ती भाषा शिकण्याची आपण सुरुवातच केलेली नसते.कोणतीही गोष्ट अशक्य नाही.असे आपण फ़क्त म्हणतो.त्या विधानास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण फ़ार कमी प्रयत्न करतो.ही इंग्रजी भाषा एका महिण्यात आपण उत्तम शिकू.फ़क्त तुम्ही सुरुवात करा.दररोज एक तास. मी आज तुम्हाला अशा वेबवर नेतोय ती वेब व्याकरण तर शिकवेलच याशिवाय संभाषण कसे करावे हे ही शिकवेल.उच्चार आणि वाक्य यात समन्वय असलेले संभाषण आपल्याला नक्कीच आवडेल.तुम्ही या वेबवर ब-याच भाषेत संभाषण ऐकू शकता.फ़क्त ईथे मराठी भाषा नाही.हिंदी आहे.काही हरकत नाही.सोपी हिंदी आपल्याला इंग्रजी शिकण्यास मदत करेल.मग निश्चय करा.मला एका महिण्यात इंग्रजी शिकावयाची आहे.मग ही भाषा आपलेल जगाची सैर करण्यास मदत करेल.चला त्या वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

तुमचे जात वैधता प्रमाणपत्र तयार झाले का ते पाहू य़ा.....

इमेज
शासनाच्या निर्णयानुसार सर्वांनी जात पडताळणी प्रमाणपत्र फ़ाईल दाखल केली आहे.त्यानंतर काय झाले याचा काही पत्ता नाही.ते काम कुठपर्यंत आले ते आपण आता ओनलाईन पाहू शकतो,तुम्ही ज्या वेळेस फ़ाईल दाखल केली होती.त्यावेळेस तुम्हाला एक पावती देण्यात आली होती.त्या पावतीच्या आधारे तुम्ही तुमचे जात प्रमाणपत्र तयार झाले की नाही ते पाहू शकता.आणि प्रमाणपत्र जर तयार झाले असेल तर ते प्रिंट काढुन घेउ शकता.प्रमाणपत्राबद्द्ल कोठेही विचारणा न करता तुम्ही सरळ त्य़ा पोर्टलवर जाउन तुमच्या फ़ाईलची स्थिती पाहू शकता.त्या लिकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

चला छॊट्या बालमित्रांसाठी गंमत-जंमत ई लर्नींग..च्या जगात

इमेज
लहान मुलांना ओनलाईन शिकविणा-या वेबसाईट आज काही कमी नाहीत.शिकतांना आनंद वाटला पाहिजे आणि आनंदाने शिकता आले पाहिजे.हे जर साध्य झाले तर त्यांना शिकण्यात मजा येते. सर्व विषयांचा अभ्यास असा मजेशीर झाला की मग लहान मुले माहिती गोळा करण्यात तरबेज होतात.या पोर्टलवर एक खास बात आहे ती म्हणजे बोलणारी लहान मुलेच आहेत.आणि अभ्यास करत असताना आपण गेम खेळत आहोत असे वाटते..या ठिकाणाहून मुले बाजुला जाणार नाहीत एवढे सुंदर हे जग आहे.यात पालकांनाही सांगण्याची गरज नाही मुलेच त्यात तरबेज होतात.एकदा फ़क्त त्यांना हे पोर्टल ओळख करुन देणे महत्वाचे आहे...मग चला बालमित्रांनो त्या जगात ..भन्नाट मजा करण्यासाठी येथे क्लिक करा.

चला ICT बद्द्ल माहिती घेऊ य़ा......

इमेज
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करून शिक्षणाच्या दर्जात उल्‍लेखनीय आणि सकारात्‍मक सुधारणा करता येईल असे साधारणतः सर्वच शिक्षणतज्ञांचे व संशोधकांचे म्हणणे आहे. रटाळ अध्यापन पद्धती आता बाजुस जात असून तिची जागा आता प्रात्यक्षिक आणि स्व-अध्ययन यांनी घ्यायला सुरुवात केली आहे.माहिती ग्रहण करण्याचा वेगही कमालीचा वाढला आहे.विद्यार्थ्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर केव्हा मिळेल ? हा प्रश्नच आजच्या जगात निकाली निघाला आहे. माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे परीक्षापद्धती, माहितीचे विश्लेषण करण्याच्या पद्धती यांत अनेक बदल घडून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळविण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. आता विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे माहिती मिळवू शकतात, निरनिराळ्या प्रकारे तिचा अभ्यास करू शकतात, दैनंदिन जीवनातील घटना अभ्यासू शकतात व त्यायोगे विषय अधिक सखोलरीत्या जाणून घेऊ शकतात. अशा पद्धतीने माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे केवळ अभ्यासाची घोकंपट्टी करून गुण मिळविण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस वाढण्यात मदत होत आह...

तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ माहिती आहे का ?

इमेज
आपल्याला जन्मल्यापासूनच एक नाव प्रदान केले जाते.आता तर नवनवीन नाव उपलब्ध करुन देणा-या वेबसाईट आहेत.पण आपल्याला प्राप्त झालेल्या नावाचा अर्थ काय आहे. याचा आपण कधी विचार केला नाही.शेवटी नावात काय आहे ? असा एक विचार आपल्याकडॆ आहे.या विचाराचा विचार केला तर..शेवटी कशात काय आहे.हा प्रश्न उरतोच.मग अधिक भानगडीत न पडता.एकदा आपल्या नावाचा आपण अर्थ समजून घेण्यास काय हरकत आहे.आज मी तुम्हाला अशा एका वेबसाईट वर घेउन जाणार आहे.तिथे तुम्हाला तुमच्या फ़ोटोसह तुमच्या नावाचा अर्थ पहावयास मिळेल.याशिवाय या लिंकवर बरेच काही आहे.तुम्ही प्रथम या वेबसाईटवर पोहोचल्यानंतर डाव्या बाजूस Name Poem वर क्लिक करा. त्यानंतर एक बोक्स समोर येईल.तिथे तुमच्या मोबाईल मधील किंवा संगणकातील फ़ोटो अपलोड करा.नंतर तुमचे नाव टाईप करा..आणि फ़ोटोचा बैकग्राउंड निवडा..शेवटी सबमिट करा..काही सेकंदात तुमच्यासमोर तुमच्या नावासह तुमचा फ़ोटो येईल.पहा आपल्या नावाचा अर्थ..तिथे जाण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो नकली,बनावट विद्यापीठापासून सावधान...

इमेज
आपण आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी नेहमी धडपड करत असतो.पण ही आपली धडपड कधी-कधी वाया जाते कारण कोठेही प्रवेश घेण्यासाठी आपण तेवढी सावधानता घेत नाही.आज बनावट पदव्या देण्याचे स्तोम माजले आहे.तेंव्हा आपण वेळ,श्रम,व पैसा या बाबी वाया न घालता सजगपणे पावले उचलने महत्वाचे आहे.तुम्ही कोठेही प्रवेश घेण्या अगोदर माझ्या ब्लोगला भेट द्या.इथे Fake universities ची यादी तुम्हाला पहावयास मिळेल.आणि मग ठरवा की सदरील ठिकाणी प्रवेश घ्यायचा की नाही.यु.जी.सी.अशा विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करते.ते आपण नेहमी पहावयास पाहिजे.चला मग भारतात असे काळे धंदेवाले किती आहेत ते पाहू. य़ॆथे क्लिक करा.

मोबाईल लोकेशन पहा एक सेकंदात....

इमेज
आज मोबाईलने सर्वच क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले आहे.त्यामुळे आपला सर्वांचा मोबाईलशी संपर्क येतोच.कारण त्याशिवाय आपली कामे जलद होत नाहीत.ध्यानात ठेवा मोबाईल आपली वेळ,श्रम,आणि पैसा यांची बचत करतो..मोबाईलचे उपयोग मात्र फ़ार कमी लोकांना माहिती आहेत..कधी-कधी एखादा अनोळखी नंबरवरुन मिस्ड कोल येतो.कधी आपला मोबाईल चोरीला जातो,कधी आपल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याचे अपहरण होते..कधी विनाकारण आपल्याला अनोळखी नंबरचा मनस्ताप सहन करावा लागतो.या सर्वातून सुटका करुन घेण्यासाठी मी आज तुम्हाला एक ट्रीक देत आहे.त्याचे नाव आहे.मोबाईल लोकेशन शोधा..आणि करा त्याचा follow up .सदरील वेबवर जा आणि तुम्हाला हव्या असलेल्या मोबाईलचा नंबर रिकाम्या बोक्स मध्ये टाका.आणि सर्च करा..तिथे तुम्हाला सद्या तो मोबाईल कोणत्या राज्यात,जिल्ह्यात ,सर्कल मध्ये आहे..याची माहिती मिळेल..आहे की नाही कमाल..मग चला तो नंबर शोधण्यासाठी. येथे क्लिक करा.

चला भारतात किती scollarships मिळतात ते पाहू..

इमेज
आपल्याकडे बुद्धीमत्तेला वाव आहे किती आहे याची मात्र माहिती नाही.भारतात शेकडो ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शिष्यव्रत्त्या दिल्या जातात.आपल्याकडेही असे गरजू आणि होतकरु विद्यार्थी असतात.या माध्यमातून त्यांना प्रेरणा देता येते..कित्येक लोकांना या स्थळांची माहिती नाही.मग साहजिकच या योजने पासून विद्यार्थी दूर राहतात..महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून हा प्रपंच..या वेबवर जा ..आपली पात्रता पहा..अर्ज प्रिंट करुन घ्या आणि सदरची योजना घेउन शिक्षण पूर्ण करा..तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा..भारतातील एकूण शिष्यव्रत्त्याच्या यादीवर जाण्यासाठी    येथे क्लिक करा. 

२८ हजार शिक्षकांना प्रशिक्षण..पहा ते सोफ़्टवेअर

इमेज
महाराष्ट्रातल्या २८ हजार शिक्षकांना विद्न्यान आणि गणित विषयावर आता प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा आहे की.शिक्षकांनी कमी वेळेत अधिक माहिती विद्यार्थ्याना कशी द्यावयाची आहे.a view नावाचे सोफ़्टवेअर विकसित करण्यात आले असून त आय.आय.टी ,मुंबई विद्यापीठ इतर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांना या सोफ़्ट्वेअर च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे...कमी वेळेत अधिक माहिती हा मंत्र आता नव्या युगाचा आहे..मग ते सोफ़्ट्वेअर काय आहे.? हे मी न सांगता ते तुम्ही डाउनलोड करुन घ्या.आणि कोन्फ़रेंन्सींग द्वारे विद्यार्थ्यांना जलद माहितीचा स्त्रोत उपलब्ध करुन द्या...सदरील सोफ़्टवेअर डाउनलोड करुन घेण्यासाठी प्रथम त्या वेबवर एक छोटॆ रजिस्ट्रेशन करावे लागेल.ते करुन तुम्ही डाउनलोड करुन घेउ शकता.आता आहे खरी मजा गणित आणि विद्न्यान शिकविण्यात...त्या वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाची खास TET साठी स्वतंत्र वेबसाईट सुरु

इमेज
महाराष्ट्र शासनाची खास TET साठी नवीन वेबसाईट सुरु.मित्रांनो मी यापुर्वी जी लिंक तुम्हाला दिली होती त्यावर शिक्षक प्रशिक्षणा बाबत ची सर्व माहिती त्यात होती.खास TET साठी वेबसाईट नव्हती.पण या परिक्षेचा आवाका विचारात घेउन शासनाने ही वेबसाईट सुरु केली आहे.ती सर्वसमावेशक नाही पण TET च्या घडामोडी या ठिकाणी पहावयास भेटतील या पोर्टवर आपल्या समस्या ,मते आदीसाठी प्राधान्य नाही.पण महत्वाचे बदल याठिकाणी पहावयास भेटतील.यापुर्वीची लिंकही ध्यानात ठेवा पण या नव्या स्वतंत्र वेबसाईटला अधिक प्राधान्य द्या..सद्या या वेबवर अधिक माहिती नाही....शासन निर्णय व इतर माहिती आहे.या नवीन वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

चला मोफ़त सोफ़्टवेअर च्या दुनियेत.....

इमेज
आपण ब-याचदा संगणकासाठी सोफ़्टवेअर घेण्यासाठी खूप भटकत राहतो.पण यश फ़ार कमी वेळा प्राप्त होते.आज बाजारात नवनवीन तंत्र विकसित होत आहेत.मग आपला संगणक सुद्धा अद्यावत ठेवावा लागतो.इंटरनेट जगतात काही सोफ़्टवेअर विकत तर काही सोफ़्टवेअर फ़्री भेटतात.सर्व सोफ़्टवेअर कोठे भेटतात याची माहिती नसते.मी आज तुम्हाला आज जी वेब सांगणार आहे.तिथे सर्व सोफ़्टवेअर अगदी फ़्री भेटतात तुमच्या संगणकासाठी जे सोफ़्टवेअर हवे ते तुम्ही घेवू शकता.ही वेब दुस-या मित्रांना सुद्धा सांगा..कारण संगणक इंटरनेट चालू असताना सूचना करत राहतो.तुम्ही जुने सोफ़्टवेअर वापरत आहात नवीन घ्या.या सूचनांकडे आपण जर जास्त वेळा दुर्लक्ष केले तर त्याची किंमत अधिक मोजावी लागते.त्या सोफ़्टवेअर च्या दुनियेत जाण्यासाठी येथे क्लिक करा.