पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चला TET चे होलटिकीट प्रिंट करुन घेऊ य़ा....

इमेज
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आपली TET ची परिक्षा येत्या १५ डिसेंबर २०१३ रोजी होणार आहे.ती सकाळ आणि दुपार या दोन सत्रात होणार आहे. त्यासाठीचे परिक्षा ओळखपत्र ओनलाईन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे.त्यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरुन ते तुम्हाला प्राप्त करुन घेता येईल. ब-याच ओळखपत्रावर उमेदवारांचे फ़ोटो आले नाहीत काही तांत्रिक अडचणीमुळॆ असे झाले आहे.त्यासाठी तुम्ही त्यावर पासपोर्ट फ़ोटो चिटकवून मुख्याध्यापकाची किंवा ईतर राजपत्रित अधिका-यांची सही घ्या. याशिवाय ईतर कारणांनी जर प्रवेश पत्र आले नसेल तर या क्रमांकावर संपर्क साधा.020-26123066 किंवा ओनलाईन तक्रार नोंदवा.व आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात रितसर तक्रार नोंदवा. तुमचे प्रवेश पत्र प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा. 

चला शालार्थ सोफ़्टवेअर द्वारे माहिती भरु या.

इमेज
सद्या जि.प.शाळा आणि शासनाचे ईतर विभाग एकाच कामात मग्न आहेत ते म्हणजे शालार्थ वरुन माहिती भरावी कशी? त्याचे सोफ़्टवेअर अद्याप उपलब्ध झाले नाही.मलाही काही मेल आणि फ़ोन आले, सर ही माहिती कशी भरावी.त्याचे सोफ़्टवेअर कोठेही उपलब्ध नाही.शोधात पडू नका.कारण ही सेवा शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ती वेबसाईट आपल्यासाठी खुली आहे.त्यावर जा आणि आपला शाळेचा एक पासवर्ड तयार करा व एक-एक पेज ओपन करा व माहिती भरा आणि सेव करा.चुका झाल्या तरी दुरुस्तीसाठी संधी आहे.त्यात घाबरण्यासारखे काही नाही. आपण भरलेली माहिती ही बरोबर आहे की नाही हे मात्र काळजीपूर्वक पहा.या सोफ़्टवेअर द्वारे आपण पेपरलेस कामाकडे अधिक गतीने वाटचाल करत आहोत हे नक्की.मग याचे स्वागत करु या.आणि आपले पगार व ईतर माहिती ओनलाईन भरु या.सदरील लिंकवर जाण्यासाठी मी लिंक देतो आहे.त्यावर क्लिक करा.पण हे ही लक्षात असू द्या.मी सदरील लिंक साठी एक विशेष कोड वापरलेला आहे.यानुसार तुम्हाला शालार्थ कधीही माझ्या ब्लोगवरुन उपलब्ध होईल.त्यात काहिही खाडाखोड करु नका.मी खालील प्रमाणे काही स्टेप्स देत आहे त्यानुसार तुम्ही एक-एक पेज भरणे महत्वाचे आह...

TET नमुना प्रश्नपत्रिका भाग--2

इमेज
नमस्कार मित्रांनो.आपल्याला काही संपर्क करु शकलो नाही.आपला अभ्यास ब-यापैकी चालला असेल अशी आशा बाळगतो.सद्या आपल्या आजुबाजुला क्लासेसचे फ़सवे पीक खुप दिसते आहे.त्यात फ़सू नका.कारण त्यात काही चांगले काम नाही.या लोकांनी धंदा खोलला आहे.दोन चार पुस्तके गोळा करावयाची आणि क्लासेसचा धंदा उभा करायचा यात तरुणांना खेचायचे आणि फ़ळ काय तर भ्रमनिरास.असो. मी आजपासून तुमच्या समोर प्राथमिक स्तरावरचे काही निवडक प्रश्न ठेवणार आहे.हे प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारीत आहेत.वाचा चिंतन करा.हवे असल्यास त्याची प्रिंट करुन घ्या.मी प्रिंटसाठी माझ्या ब्लोगवर कोणताही लोक किंवा कोड मारत नाही.ही माहिती अधिक लोकांपर्यंत गेली पाहिजे.मला खात्री आहे की हे सर्व तुम्हाला पटॆल.चला तर मग मी प्राथमिक व माध्यमिक स्तरावरचे प्रश्न घेउन येतोय ते वाचा.काही ठिकाणी TET रद्द करावी म्हणून आंदोलने होत आहेत.पण आपण याचाही अभ्यास करायला हवा की,२० राज्यात ही परिक्षा घेतली जाते.मग ती आपल्यासाठी कशी काय रद्द होईल..तेंव्हा अभ्यास करा... २

फ़ेसबुक प्रेमींनो फ़ेसबुक प्रेमातील धोके समजून घ्या.

इमेज
फ़ेसबुक याचा अर्थच मुळात "चेह-याचे पुस्तक" हा आहे.ते विचाराचे पुस्तक नाही.चेहरे वाचता येतात पण चेह-यांसोबत जगता येत नाही.आपल्याला शेवटी विचारासोबतच जगावे लागते.विचार हाच माणसांचा खरा सोबती आहे.पण अलिकडे फ़ेसबुक एक नशा होऊन तरुणाई त्यात बेहोश झाली आहे.फ़ेसबुक तुमचा मित्र नाही हे कायमचे लक्षात ठेवा.फ़ेसबुक बद्दल विनोदाने असे म्हंटले जाते की, "फ़ेसबुक वर त्याचे हजार मित्र पण विचारत नाही त्याला गल्लीतलं कुत्रं" यात जेवढा विनोद आहे तेवढे गांभिर्य ही आहे.फ़ेसबुक तुम्हाला एका मर्यादेपर्यंत संधी देते.अधिक काही करण्यासाठी तुम्हाला कधीच संधी देत नाही.तुम्हाला html  कोड वापरता येत नाही,तुम्हाला एखादी जाहिरात देता येत नाही,एखाद्या वेबचा प्रचार करता येत नाही.फ़क्त इमेज टाका आणि कमेंट्स द्या. फ़ेसबुक एक कंपनी आहे.तुम्ही जेवढे क्लिक त्यावर कराल तेवढे पैसे त्या कंपनीला मिळतात.वास्तविक आपल्या फ़ेसबुक पेजवर जेवढे क्लिक झाले तेवढे पैसे आपल्याला मिळावयास हवे पण ती देत नाही.तुमच्या मतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक साधने आहेत.पण आपण त्याचा वापर करत नाही.ब्लोग काढा किंवा वेबसाईट काढा त्...

TET नमुना प्रश्नपत्रिका भाग---१

इमेज
नमस्कार मित्रांनो .दिवाळीत आपल्याला काही संपर्क करु शकलो नाही.आपला अभ्यास ब-यापैकी चालला असेल अशी आशा बाळगतो.सद्या आपल्या आजुबाजुला क्लासेसचे फ़सवे पीक खुप दिसते आहे.त्यात फ़सू नका.कारण त्यात काही चांगले काम नाही.या लोकांनी धंदा खोलला आहे.दोन चार पुस्तके गोळा करावयाची आणि क्लासेसचा धंदा उभा करायचा यात तरुणांना खेचायचे आणि फ़ळ काय तर भ्रमनिरास.असो. मी आजपासून तुमच्या समोर प्राथमिक स्तरावरचे काही निवडक प्रश्न ठेवणार आहे.हे प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारीत आहेत.वाचा चिंतन करा.हवे असल्यास त्याची प्रिंट करुन घ्या.मी प्रिंटसाठी माझ्या ब्लोगवर कोणताही लोक किंवा कोड मारत नाही.ही माहिती अधिक लोकांपर्यंत गेली पाहिजे.मला खात्री आहे की हे सर्व तुम्हाला पटॆल.चला तर मग मी प्राथमिक व माध्यमिक स्तरावरचे प्रश्न घेउन येतोय ते वाचा.                                                                               ...

आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन यांत काय फ़रक आहे ?त्यांची साधन तंत्रे कोणती ?

इमेज
शाळेत जी मुले शिकण्यासाठी येतात त्यांच्या अध्ययनाचे मूल्यामापन होणे गरजेचे आहे.मग ते कसे झाले पाहिजे ? यापूर्वीची मूल्यमापन पद्धती योग्य नव्हती का? तर याला उत्तर असे की,शिक्षण ही सतत बदलाची प्रक्रिया आहे.नवनवीन प्रयोगातून त्याची सिध्दता करावी लागते. "थोडक्यात असे म्हणता येईल की,शिकण्याची प्रक्रिया योग्य रितीने ,अपेक्षित गतीने चालली आहे की नाही याची पडताळणी करत राहणे म्हणजे आकारिक मूल्यमापन होय.शिकविण्याचा एक टप्पा पुर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे निरनिराळे निकष वापरुन पाहणे म्हणजे संकलित मूल्यमापन होय. आकारिक मूल्यमापनाची साधन व तंत्रे. आकारिक मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा वेध सातत्याने घेतला जातो.हे एक कौशल्याचे काम आहे.कारण अध्ययन ही विद्यार्थ्यांच्या मनात सुरु असणारी अमूर्त प्रक्रिया आहे.अमूर्त मनोव्यापाराचे द्रुश्य रुप विद्यार्थ्यांच्या वर्तनामधे दिसते हे वर्तन निरनिराळे असू शकते.या वर्तनाची नोंद घेण्यासाठी काही साधने वापरावी लागतात. १] दैनंदिन निरीक्षण. २] तोंडी काम--प्रश्नोत्तरे,प्रकट वाचन,भाषण संभाषण , भुमिकाभिनय,मुलाख...

मित्रांनो चला एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करु या.काही सुंदर विचारांची.

इमेज
प्रत्येक दिवाळी आपण आनंदाने साजरी करतो.यासाठी शुभेच्छाही देतो.एक आनंदाचा सण म्हणून आपण या सणाकडे पाहतो.अलिकडे मात्र या सणातला गोड्वा हरवत चालला आहे.माझ्या लहाणपणापासून मी ऐकत आलो आहे की, या वर्षी आपण दिवाळीला फ़टाके वाजवणार नाही.तुम्हाला माहित आहे की नाही हे मला माहित नाही पण आपल्या या क्षणिक आनंदासाठी कोण आपले मौलिक जीवन हरवून बसते.दरवर्शी हजारो लोक बहिरे होतात.लहान मुलांना कायमचे बहिरेपण येते.ती बारुद जर चेह-यावर पड्ली तर चेहरा कायमचा काळा पड्तो.गर्भवती महिलेने जर हा जोराचा आवाज ऐकला तर ते बाळ दचकते आणि बहिरेपणा येतो.फ़टाक्यांचा धुर जर डोळ्यात गेला तर,डोळे बरेच दिवस जळ-जळ करतात व नजर कमी होते.या काळात गायी,म्हशी कमी दुध देतात.कारण फ़टाक्याच्या आवाजामुळॆ त्यांना पान्हा सुटण्यास त्रास होतो.फ़टाक्याच्या कारखान्यात काम करणारी लहान मुले स्फ़ोटात बळी पडतात.महिला दगावतात व त्यांचे संसार उघड्यावर पडतात. या दिवसात बाजारात नकली मिठाई भरपूर येतात.त्या खाल्यामुळॆ -हदय रोग वाढतात,मधुमेही जग सोडुन जातात.चेह-यावरचे चैतन्य जाते.त्वचारोग बळावतात.शासनाने यावर्षी मोठी जाहिरात देऊन जनतेला साव...