आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन यांत काय फ़रक आहे ?त्यांची साधन तंत्रे कोणती ?
शाळेत जी मुले शिकण्यासाठी येतात त्यांच्या अध्ययनाचे मूल्यामापन होणे गरजेचे आहे.मग ते कसे झाले पाहिजे ? यापूर्वीची मूल्यमापन पद्धती योग्य नव्हती का? तर याला उत्तर असे की,शिक्षण ही सतत बदलाची प्रक्रिया आहे.नवनवीन प्रयोगातून त्याची सिध्दता करावी लागते.
"थोडक्यात असे म्हणता येईल की,शिकण्याची प्रक्रिया योग्य रितीने ,अपेक्षित गतीने चालली आहे की नाही याची पडताळणी करत राहणे म्हणजे आकारिक मूल्यमापन होय.शिकविण्याचा एक टप्पा पुर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे निरनिराळे निकष वापरुन पाहणे म्हणजे संकलित मूल्यमापन होय.
आकारिक मूल्यमापनाची साधन व तंत्रे.
आकारिक मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा वेध सातत्याने घेतला जातो.हे एक कौशल्याचे काम आहे.कारण अध्ययन ही विद्यार्थ्यांच्या मनात सुरु असणारी अमूर्त प्रक्रिया आहे.अमूर्त मनोव्यापाराचे द्रुश्य रुप विद्यार्थ्यांच्या वर्तनामधे दिसते हे वर्तन निरनिराळे असू शकते.या वर्तनाची नोंद घेण्यासाठी काही साधने वापरावी लागतात.
१] दैनंदिन निरीक्षण.
२] तोंडी काम--प्रश्नोत्तरे,प्रकट वाचन,भाषण संभाषण , भुमिकाभिनय,मुलाखत,गटचर्चा,
३] प्रात्यक्षिक /प्रयोग.
४] उपक्रम क्रुती.
५] प्रकल्प.
६] चाचणी वेळापत्रक जाहीर न करता.पुस्तकासह चाचणी.
७] स्वाध्याय/वर्गकार्य --माहिती लेखन,वर्णन लेखन ,निबंध लेखन, अहवाल लेखन,कथा लेखन,पत्र लेखन संवाद लेखन ,कल्पना विस्तार.
८] इतर --प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन,स्वयंमूल्यमापन गटकार्य.
या सर्व बाबींचा अभ्यास TET च्या सर्व विद्यार्थ्यांनी करावा...प्राथमिक शिक्षणाची मूल्यमापन प्रक्रिया सद्द्या यावरच चालते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा