चला हा देश सुधारण्यास हातभार लावू या..AAP. आपल्या प्रतीक्षेत आहे.

मित्रांनो, जगातील पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी झेड सुरक्षा नाकारली.असा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही की ज्यांने अलिशान बंगला नाकारला.कसलीच नेतेगीरी न करणारे अरविंद केजरीवाल हा अवलिया जगावेगळा आहेच..एक स्वप्न घेऊन तो भारतासाठी उभा आहे.आप ची टीम साधी माणसे नाहीत ती उच्चशिक्षीत तर आहेतच साधी राहणारी आणि ध्येयवेडी आहेत.. आजपर्यंत लोकशाहीत ६०% मतदान व्हायचे कारण ही मानसिकता या भ्रष्ट राजकारण्यांमुळे झाली होती.कोणालाही आपल्या देशात लोकशाही आहे हे खरे वाटत नव्हते.त्याची फ़ळे फ़क्त राजकारण्यांनाच मिळाली.सामान्य माणूस पिचत राहिला.हत्या,बलात्कार,खून,दरोडे हे रोजचेच नवे काही नाही.रोजगारांना न्याय नाही.चांगले शिक्षण नाही.दवाखाने नाहीत.प्रत्येक योजनेत टक्केवारी हे सुत्र रुढ झाले होते. तुम्हाला वाटत असेल की आज कसा काय वेगळा विषय ब्लोगवर आला.मित्रांनो मी आजपर्यंत मतदान केले नाही.कारण मला एकाही पैशाचा भ्रष्टाचार न करणारा उमेदवार दिसला नाही.मी आजही शोधात आहे,जो स्वच्छ उमेदवार सामान्य माणूस म्हणून जगणारा,विकास साधणारा,टक्केवारी न करणारा,पैसे न वाटणारा असा जो भेटेल त्याला आपले मत.जे ४०% लोक आजही म...