पोस्ट्स

जून, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चला जगातील एक संदर आणि पवित्र पुस्तक पाहू या.

इमेज
मित्रांनो आज एक खास पुस्तक आपल्यासाठी घेउन आलोय..हे पुस्तक कदाचित तुमच्याकडे असेल..पण ब-याच व्यक्तींना शोधावे लागते.मी आज हे पुस्तक तुम्हाला मोफ़त उपलब्ध करुन देत आहे, जगातील एक सुंदर पुस्तक आहे असे मला प्रामाणिकपणे कबुल करावे वाटते.सुंदर भाषा .सुंदर विचार,सुंदर शब्द लिहावे आणि बोलावे ते साने गुरुजीनेंच एक सुंदर व्यक्तीमत्व म्हणून साने गुरुजी मला अतिशय प्रिय वाट्तात.मी अतिशय आवडीने जर कोणाची पुस्तके वाचली असतील तर ती साने गुरुजींची.एम.ए. ला खूप पुस्तके होती पण ती फ़क्त कामापुरती वाचली.ती कायमची आठवणीत नाही राहिली. कारण -हदयाला स्पर्श करण्याची ताकत त्या ग्रंथामधे नव्हती. पण भारतीय संस्क्रती,श्यामची आई,सुधास पत्रे ईत्यादी नी मी पुरता बांधला गेलो.कारण या चिरंतन मूल्ये दडलेली आहेत. अशी ही मराठी कादंबरी प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असायलाच हवी. निदान त्याच्या मोबाईल आणि कंप्युटरवर तर हवीच हवी. एक असे सुंदर पुस्तक जे कुठूनही वाचायला घ्यावे. यात चाळीस वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यातून श्यामच्या आईचे चित्र उभॆ रहाते. ते चित्र कोणत्याही आई सारखेच आहे. आपल्या मुलाला चांगले वळण लावणार्‍या आईचे. आ...