चला ओनलाईन शिकण्यासाठी तयार रहा...

मित्रांनो सद्याचे युग आपल्यासाठी प्रचंड साधने घेऊन आले आहे.त्याचा वापर अधिक करुन आपण आपले जीवन अधिक सूंदर कसे बनवतो हीच आपली खरी परिक्षा आहे.गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना आज शिकवणी परवडत नाहीत. महागड्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही.मग नाराज होणे हे आपल्या कदापि मनात ठेवू नका. आज हजारो लोक आपल्या सेवेसाठी तयार आहेत. त्यांची सेवा स्विकारण्याची तयारी ठेवा.उत्तम शिक्षकांचे अध्यापन रेकोर्ड करुन आज हजारो विद्यार्थ्यांनी युट्यूब वर टाकले आहे.ते पहा आणि शिकत रहा. एखाद्या प्रसिद्ध लेक्चररचं लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर सहज बघायला मिळू शकतं. केवळ आयआयटी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजांमध्येच नव्हे तर आर्टस-सायन्स-कॉमर्स कॉलेजांमध्येही, त्यांची विशिष्ट लेक्चर्स यूट्यूबवर टाकली जातात. त्यामुळे ती बघण्याची संधी अनेक विद्यार्थ्यांना मिळतेय. अनेक कॉलेजं हळूहळू हा फंडा राबवताना दिसत आहेत.याशिवाय आता पर्याय राहिला नाही. प्रत्येक महाविद्यालयाने वेगळे फ़ंडे वापरणे महत्वाचे आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये वेब आणि व्हिडीओजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. जॉब करणाऱ्या किंवा नियमितपणे कॉलेजला न ...