पोस्ट्स

ऑगस्ट, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपक्रम आणि कार्यक्रमा साठी एक उपयुक्त वेबसाईट..

इमेज
  शालेय कामकाजात विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम आणि कार्यक्रमांना अतिशय महत्वाचे स्थान आहे.शिक्षण म्हणजे केवळ गुणांची बेरीज नसून अधिक काही आहे.हे आपण समजून घेतले पाहिजे.कारण व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी सर्वसमावेशक गुणांची गरज असते.आज गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्व आल्याने खरे शिक्षण बाजुला पडले आहे.याचाच परिणाम म्हणून की काय आजचे शिक्षण एक व्यवहार ठरले आहे. शिक्षणातून जसा मानव घडला पाहिजे तसा तो घड्ला जात नाही.माहिती चे संकलन म्हणजेच आजचे शिक्षण होय अशी निरर्थक व्याख्या केल्याने आम्हाला शिक्षणापासून जी फ़ळे मिळावयास हवी होती ती मिळत नाहीत. अशा विविध उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना पूरक अनुभव देणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा विविध प्रश्नांची उकल ही वेबसाईट करते. या ठिकाणी ब-याच स्पर्धा ही आयोजित केल्या जातात. या सर्वांना एकदा विद्यार्थ्यांनी पहावे. सदरील वेबसाईटवर जाण्यासाठी   येथे क्लिक करा.