भारतातील जंगलात आगी लावल्या जातात की लागतात.

दरवर्षी उन्हाळ्यात जंगल धाय मोकलून रडते आणि माणूस मात्र मुग गिळून गप्प बसतो.निसर्गाने मन:पूर्वक केलेल्या झाडांच्या संवर्धनाचा कोळसा होतो.भारतात आगी आपोआप लागण्याचे प्रमाण एक टक्का आहे.पण लावल्या जाण्याचे प्रमाण मात्र अधिक आहे.जंगलच आपला रक्षण कर्ता आहे.हे मानवास कळलेच नाही.पर्यावरणवादी म्हणून थकले कित्येक मेले पण त्यांचे ऐकण्याचा शहाणपणा मात्र कोणी दाखवला नाही.आज जी अवस्था मानवजातीची झाली आहे त्यास हे बेताल वर्तन कारणीभूत आहे.जल, जंगल आणि जमीन याबाबत आम्ही कधी विचार केला नाही.ती वारेमाप वापरली याची फ़ळे आता भोगावी लागतील.वेळ निघून गेली आहे.आता फ़क्त सहन करणे एवढेच आपल्या हातात आहे. पावसाळा सुरू होताच शासनामार्फत वृक्ष लागवडीसाठी विविध कार्यक्रम आखले जातात; पण संवर्धनाची विशेष काळजी घेतली जात नाही. परिणामी, खर्च व्यर्थ जातो. शिवाय शासकीय विभाग लाकूड चोरांवर अंकुश लावण्यातही अपयशी ठरत आहे. यामुळे उन्हाळ्यातच मोठ-मोठ्या वृक्षांचा कोळसा होत असल्याचे दिसते. सध्या सर्वत्र झाडांतूनच धूर निघत असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.तयार रहा.आणि चिंतन करा वाटल्यास थोडे वाईट वाटेल.निसर्ग प्रेमीना वेड...