वृक्ष लागवड कार्यक्रम ते वृक्षतोड व्यवसाय..जंगलाचे खरे मारेकरी कोण ?

जंगलाच्या बचावासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासन आणि राजकीय टेबलावर व व्यासपीठावर जे नियोजन होते ते अक्षरश: भारावून टाकणारे असते.गेल्या दहा वर्षापासून हाच कार्यक्रम चालू आहे. त्याची फ़ळे आपण आज चाखत आहोत.१०० टक्के जंगलापैकी आज जंगल ६० टक्के खाऊन टाकले लोकांनी यात आदिवासी अत्यल्प आहे.तर राजकारणी व तथाकथित उद्द्योग सम्राट य़ांनी जंगलाची जमीन घशात घातली आहे.आता ४० टक्के जंगल शिल्लक आहे.त्याचा पुळका म्हणून विविध योजना कागदोपत्री राबवणे व त्या गिळंक्रत करणे हा एकमेव व्यवसाय सद्द्या महाराष्ट्रात जोर धरुन आहे. दशलक्ष वृक्ष लागवड.वृक्ष संगोपन,रोपवाटीका,एक माणूस एक झाड आदी विविध कार्यक्रमातून जी पैशाची उधळपट्टी होते त्याचे आऊटपूट कोणीही पाहत नाही.सामाजिक वनिकरण, कृषी विभाग,वन परिक्षेत्र,कृषी महाविद्द्यालये,आणि पर्यावरण चळवळी यांनी रीतसर असा योजना हडप कार्यक्रम आखलेला आहे. दोन वर्षापूर्वी शासनाने शेतक-यांना रोपवाटीका दिल्या त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला.लोकांनी अनुदान उचलले.यात विशेषत: राजकारणी होते.त्यात सरपंच,पंचायत समिती सदस्य,जि.प.सदस्य.आणि प्रशासनातील योजना राबवणा...