महाराष्ट्रात पुरवठा विभागाची प्रचंड अनागॊंदी.आणि ग्राहक वितरण प्रणाली.

महाराष्ट्रात पुरवठा विभागाची प्रचंड अनागॊंदी.आणि ग्राहक वितरण प्रणाली. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा अनागोंदीपणा आता जनतेला नवीन नाही.तरीपण यात म्हणाव्या तेवढ्या सुधारणा झाल्या पाहिजेत या मानसिकतेचे प्रशासन नाही.हे एक न सुटणारे कोडे आहे.जनतेच्या हक्काचे केरोसीन व धान्य त्यांना न देता प्रशासनातील अधिकारी आणि अर्धघाऊक व किरकोळ विक्रेते पोसण्याचे काम केले जाते.यावर तात्पुरता उपाय केला आहे असे दाखवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ग्राहक वितरण प्रणाली कार्यन्वित केली आहे.याचा वापर सामान्य मानसाला कसा काय करता येईल याचा विचार अद्द्याप प्रशासनाने केला नाही. जे लोक ओनलाईन तक्रार नोंदवतात त्याच्या तक्रारीचा परिणाम काय होतो.हे पाहण्याचे परिमान प्रशासनाकडे नाही. ग्रामीण व आदिवासी विभागातील लोकांना आजही वेळेवर धान्य मिळत नाही.साखर तर नाहीच नाही.ही यंत्रणा वाटप केल्याचा नुसता देखावा करते वाटप मात्र काही प्रमाणातच होते. दुष्काळी भागातील लोकांना आधार म्हणून उन्हाळ्यात राज्यातील काही बाधित जिल्हे यांच्यासाठी धान्य पुरवठा योजना राबवली पण याचा कोणताच ताळमेळ प्रशासनाने लागू दिला नाही.सरळ ...