चला आदिवासींसाठीचा पेसा कायदा पाहू या.....

भारतातील जमिनीचे व जंगलाचे संरक्षण जर कोणी केले असेल तर ते आदिवासी जातींनी पण या मोबदल्यात त्यांना मात्र समाजाने उपेक्षा दिली.आणि घोर निराशा केली.जल,जंगल आणि जमीन यांचा सन्मान प्रथम त्यांनीच केला पर्यावरणाच्या विरोधात त्यांनी कोणतेही पाउल उचलले नाही.माणसांनी मात्र त्यांच्यावर कायद्याचा व त्यांच्या दारिद्र्याचा फ़ायदा घेऊन अन्याय अत्याचार केले.ही मानसिकता आजही थांबलेली नाही.असे का व्हावे हे याचा विचार करण्यास मानवाकडे आज तरी वेळ नाही. प्रदुषणा चा ज्यावेळी कहर होईल तेंव्हा समाज आत्मपरीक्षण करेल त्यावेळी मात्र वेळ संपून गेली असेल.सागवान तस्कर तर आज मोठे गुंड होऊन बसले आहेत.त्यांना मोठे कोणी केले तर वनाधिका-यांनी व राजकारण्यांनी आता तेच गुंड यांच्या मुळावर ऊठले आहेत. गेल्या वर्षी किनवट च्या जंगल्यात या गुंडानी वनरक्षकावरच हल्ला केला त्यांना जीव मुठीत धरुन पळावा लागला.अशी शोकांतिका आज सर्वत्र पहावयास मिळत आहे.याला जबाबदार आदिवासी नाही..त्यांच्या जगण्यात ज्यांनी हस्तक्षेप केला ते जबाबदार आहेत. आदिवासींच्या जमिनी तर आज प्रचंड प्रमाणात हडप केल्या आहेत. प्रकल्पाच्या नावाखाली कारखानद...