अद्यावत Answer key साठी प्रतीक्षा करा.

विद्यार्थी मित्रांनो मी मागच्या पोस्ट्मधे दिलेली answer key ही संभाव्य होती.याची माहिती कदाचित तुम्हाला असेलच.ती अंतिम नव्हती याची नोंद घ्या...कारण ज्या काही त्रुटी झाल्या असतील त्या दुरुस्त करुनच अंतिम उत्तरसुची प्रसिद्ध केली जाणार आहे.परिक्षा मंडळ आणि तद्न  यांच्या कडॆ आलेल्या काही तक्रारी आणि निवेदने यावर चर्चा करुनच याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
समजा काही प्रश्न चुकीचे विचारले गेले असतील तर त्याबाबत योग्य तो विचार केला जाउ शकतो..ज्यांना उतीर्ण होण्यासाठी अगदी कमी गुणांची गरज आहे.त्यांच्यासाठी ही बाब महत्वपूर्ण ठरणार आहे..

ही पहिलीच परिक्षा होती त्यामुळे यात झालेल्या चुका येणा-या परिक्षेत त्या नक्कीच कमी असणार आहेत.विषयाला जे समान महत्व द्यायला हवे होते ते दिले गेले नाही.प्रश्नांची काठीण्य पातळी राखली गेली नाही.
प्रश्नांचे काही पर्याय चुकीचे होते.
शुध्दलेखनाकडॆ तितकेसे लक्ष दिले गेले नाही.या ज्या अशा अनेक प्रकारच्या तक्रारी परिक्षार्थींनी केल्या आहेत.त्याबाबतीत मंडळ य़ॊग्य ती दखल घेईलच..
पण एक मात्र नक्की की,शिक्षण या विषयाचा आवाका मात्र आपल्या लक्षात आला असेलच.एक मात्र पक्के ठरवा.अभ्यासाला पर्याय नाही.माहिती संकलन करण्यात सातत्य हाच यशाचा मार्ग आहे.
शेवटी हेच सत्य आहे.शिक्षक हा जन्मभर विद्यार्थीच असतो.असावा लागतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट