चला सूट्ट्यांचा आनंद एका वेगळ्या पद्धतीने घेऊ या.....

मित्रांनो आता आपल्याला सूट्ट्य़ा लागणार आहेत सद्या निकाल बनवणे व तो जाहीर करणे या कामात व्यस्त आहोत.सुट्ट्या आपण काही स्वस्थ जाऊ देत नाही ते खरे ही आहे.आपल्याला 
सुट्ट्याचाही पगार मिळतो कारण सुट्ट्यातही आपले चिंतन आणि मनन अव्याहत चालु असते ते असावयासही हवे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्य़ा आपण एका चांगल्या कामासाठी समर्पित करु या.ते म्हणजे चांगली पुस्तके वाचणे व स्वत:ला अपडेट ठेवणे.यासाठी तुम्ही छानछान पुस्तके संकलीत करा.मी तो खजिना तुमच्यासाठी आणणार आहे. ते ही मोफ़त.अलिकडे पुस्तक वाचण्याचे वेड कमी होत आहे.याचा परिणाम असा होत आहे की, आपण आत्मविश्वासापासून दूर जात आहोत.माणसाचे सर्वात मोठे भांडवल आहे ते म्हणजे त्याच्याकडे असलेले ज्ञान.ते त्याने कोणत्याही परिस्थितीत प्राप्त केले पाहिजे.मग यासाठी किंमत मोजावी लागली तरी चालेल.विज्ञानाचे एक छान पुस्तक मला मिळाले सर्व महत्वाची निबंध तुम्हाला येथे मिळतील.विज्ञान आणि जग यांचा सुंदर ताळमेळ यात घातला आहे. ते तुम्हाला आवडेल हे पुस्तक २०४ पेजचे आहे. डाउनलोडसाठी
येथे क्लिक करा.

विज्ञानासंदर्भात काही प्रश्न मुले विचारतात आणि त्यांची उत्तरे आपल्याला वेळेवर मिळतीलच असे नाही.तेंव्हा दैनंदिन जीवनातील ही काही खास महत्वपूर्ण बाबी माहिती असणे महत्वाचे आहे.आजुबाजुला आपण कित्येक बाबी अनुभवतो पण त्यातही अर्थपूर्ण विज्ञान लपलेले आहे याची माहिती आपणास नसते.मस्त विनोदी पद्धतीने हे पुस्तक तयार केले आहे.वाचताना मुलांना कंटाळा येणार येणार नाही हे नक्की.एक छोटे पुस्तक डाउनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट