चला हा देश सुधारण्यास हातभार लावू या..AAP. आपल्या प्रतीक्षेत आहे.

मित्रांनो,
जगातील पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी झेड सुरक्षा नाकारली.असा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही की ज्यांने अलिशान बंगला नाकारला.कसलीच नेतेगीरी न करणारे अरविंद केजरीवाल हा अवलिया जगावेगळा आहेच..एक स्वप्न घेऊन तो भारतासाठी उभा आहे.आप ची टीम साधी माणसे नाहीत ती उच्चशिक्षीत तर आहेतच साधी राहणारी आणि ध्येयवेडी आहेत..
आजपर्यंत लोकशाहीत ६०% मतदान व्हायचे कारण ही मानसिकता या भ्रष्ट राजकारण्यांमुळे झाली होती.कोणालाही आपल्या देशात लोकशाही आहे हे खरे वाटत नव्हते.त्याची फ़ळे फ़क्त राजकारण्यांनाच मिळाली.सामान्य माणूस पिचत राहिला.हत्या,बलात्कार,खून,दरोडे हे रोजचेच नवे काही नाही.रोजगारांना न्याय नाही.चांगले शिक्षण नाही.दवाखाने नाहीत.प्रत्येक योजनेत टक्केवारी हे सुत्र रुढ झाले होते.
तुम्हाला वाटत असेल की आज कसा काय वेगळा विषय ब्लोगवर आला.मित्रांनो मी आजपर्यंत मतदान केले नाही.कारण मला एकाही पैशाचा भ्रष्टाचार न करणारा उमेदवार दिसला नाही.मी आजही शोधात आहे,जो स्वच्छ उमेदवार सामान्य माणूस म्हणून जगणारा,विकास साधणारा,टक्केवारी न करणारा,पैसे न वाटणारा असा जो भेटेल त्याला आपले मत.जे ४०% लोक आजही मतदानापासून दूर आहेत ते याच कारणामुळे.लोकशाही फ़क्त ६०% लोकांची आहे.त्यातही बहुमत असलेला पक्ष कोणता ? त्याच्या मताची विभागणी केली तर १२% लोकांची लोकशाही.एक विचित्र अवस्था तयार झाली होती...आपले स्थान ४०% मतदान न करणा-या लोकांच्या यादीत आहे.

आता लोकांना थोड्या आशा वाटत आहेत.काही परिवर्तन होईल.देश आता नेत्यांना कंटाळला आहे.आता सेवकांना मान राहील.यातच देशाचे कल्याण आहे.तरुणांना एक आदर्श मिळाला.तो आदर्श आपण स्विकारला पाहिजे.आय़ुश्यात पैसा हा गौण आहे.तत्व आणि विचारच माणसाला मांगल्याकडे नेतात.काही लोकांची आणि न्यूज पेपरची सडलेली मानसिकता सुधारण्यास तयार नाही,,कारण आपल्याला मिळणारा मलिदा आता मिळणार नाही.तरुणांनी हे समजून घेणे महत्वाचे आहे.असे तुफ़ान फ़ार कमी वेळा येतात.या देशाचे आपण सुपुत्र आहोत.या देशासाठी आपण काही केले पाहिजे हे ध्यानात ठेवा.
मी या पक्षाचा कोणी नाही,पण "जिथे दिव्यत्वाची प्रचिती,तेथे कर माझे जुळती"जर तुम्हाला माझे मत आवडले तर घ्या..पण विचार जरुर करा.माझी मते नाही आवडली तर सोडून द्या.
जर आवडली तर या पार्टीला जोईन करा.
आपला आपले करण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यागाच्या भावनेतून काम करावयाचे असेल तर उमेदवार म्हणून निवडून यायचे असेल तर अर्ज भरा..उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक,शिक्षण,आणि समाजव्यवस्था याचा परस्परसम्बद्भ.

ICT VIP QUESTION FOR COMPUTER EXPERT AND STUDENTS PART-02