चला जगातील एक संदर आणि पवित्र पुस्तक पाहू या.

मित्रांनो आज एक खास पुस्तक आपल्यासाठी घेउन आलोय..हे पुस्तक कदाचित तुमच्याकडे असेल..पण ब-याच व्यक्तींना शोधावे लागते.मी आज हे पुस्तक तुम्हाला मोफ़त उपलब्ध करुन देत आहे, जगातील एक सुंदर पुस्तक आहे असे मला प्रामाणिकपणे कबुल करावे वाटते.सुंदर भाषा .सुंदर विचार,सुंदर शब्द लिहावे आणि बोलावे ते साने गुरुजीनेंच एक सुंदर व्यक्तीमत्व म्हणून साने गुरुजी मला अतिशय प्रिय वाट्तात.मी अतिशय आवडीने जर कोणाची पुस्तके वाचली असतील तर ती साने
गुरुजींची.एम.ए. ला खूप पुस्तके होती पण ती फ़क्त कामापुरती वाचली.ती कायमची आठवणीत नाही राहिली. कारण -हदयाला स्पर्श करण्याची ताकत त्या ग्रंथामधे नव्हती. पण भारतीय संस्क्रती,श्यामची आई,सुधास पत्रे ईत्यादी नी मी पुरता बांधला गेलो.कारण या चिरंतन मूल्ये दडलेली आहेत.
अशी ही मराठी कादंबरी प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असायलाच हवी. निदान त्याच्या मोबाईल आणि कंप्युटरवर तर हवीच हवी. एक असे सुंदर पुस्तक जे कुठूनही वाचायला घ्यावे. यात चाळीस वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यातून श्यामच्या आईचे चित्र उभॆ रहाते. ते चित्र कोणत्याही आई सारखेच आहे. आपल्या मुलाला चांगले वळण लावणार्‍या आईचे. आपला मुलगा निरोगी रहावा म्हणून झटणार्‍या आईचे. वाचकाला भावनावश करण्याचे प्रचंड सामर्थ्य असणार्‍या साने गुरुजींच्या लेखणीतले हे एक पुस्तक. आपण वाचणार तर आहातच. पण आपल्या आजुबाजूच्या लोकांना, आपल्या दूरवरच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवायला विसरू नका.
हे पुस्तक या ब्लोगवर आहे. हे ईतरांनाही सांगा प्लिज माझ्यासाठी मित्रांना एक एस.एम.एस. करा हे पुस्तक सर्वांना वाचू द्या. समाजमन कोमल शब्दात बांधण्यासाठी या पुस्तकाची नितांत गरज आहे.
धन्यवाद.
हे पुस्तक डाउनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक,शिक्षण,आणि समाजव्यवस्था याचा परस्परसम्बद्भ.

ICT VIP QUESTION FOR COMPUTER EXPERT AND STUDENTS PART-02